पेट्रोल पंप कर्मचारी झोपेत असताना खिशातील ३० हजार चोरले.अज्ञात चोरटय़ाविरूद्ध गुन्हा दाखल, जामखेडची घटना
जामखेड
जामखेड खर्डा रोडवरील जमदारवाडी शिवारातील पेट्रोल पंपावरील कर्मचारी झोपेत असताना यातील फीर्यादी मल्हारी भाऊसाहेब कोल्हे यांच्या खिशातून अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये रोख चोरून खिसा साफ केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेट्रोल पंप कर्मचारी मल्हारी भाऊसाहेब कोल्हे वय ३९ वर्ष धंदा, पेट्रोलपंप सेल्समन रा. राजुरी तालुका जामखेड व आणखी एक कर्मचारी साक्षीदार असे दोघे दि. २९ मे २०२२ रोजी रात्री जामखेड पासुन ८ किमी अंतरावरील खर्डा रोडवरील जमदारवाडी शिवारातील पेट्रोल पंपावर झोपले असताना मध्यरात्री आडीच वाजण्याच्या सुमारास अनोळखी चोरट्याने ३० हजार रुपये रोख रक्कम चोरुन खिसा साफ केला. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्यादी कर्मचारी मल्हारी भाऊसाहेब कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. भागवत हे करत आहेत.
0 टिप्पण्या