वर्षाला महासागरात 11 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा
नद्यांतून समुद्रात अन् समुद्रातून महासागरात वाहत जाणार्या प्लास्टिकच्या कचर्याने महाकाय महासागरच गिळंकृत करण्याकडे वाटचाल सुरू आहे.
वर्षाला महासागरात 11 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा आपण सागरांच्या पोटात टाकत आहोत. परिणामी महासागरातील 236 प्रकारच्या जलचरांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत; तर सागरासाठी पोषक ठरणारे 50 टक्के प्रवाळ नष्ट झाले आहे. अमेरिकेतील सागरी तज्ज्ञांनी याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने दरवर्षी 8 जून हा जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो. सन 2030 पर्यंत जगातील 30 टक्के महासागर शुद्ध करण्याची शपथ जगातील सर्व राष्ट्रांनी घेतली आहे. यंदाच्या महासागरदिनी हीच थीम घेऊन काम सुरू केले जाणार आहे. जगापुढे सर्वांत मोठे आव्हान आहे ते महासागरातील प्लास्टिकचा कचरा कसा कमी करायचा. महासागरात कोट्यवधी जलचर आहेत.
यापैकी दीड ते दोन लाख जाती आजवर शास्त्रज्ञ शोधू शकले आहेत. माशांच्याच सुमारे 20 ते 30 हजार जाती आहेत. यापैकी 236 जाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत. तसेच पोटात प्लास्टिक गेल्याने 90 टक्के मोठे मासे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असा अहवाल अमेरिकेतील विविध संशोधन संस्थांचा आहे.
दरवर्षाला सुमारे 11 दशलक्ष टन कचरा आपण सागराला देत आहोत, त्यामुळे 2040 पर्यंत तब्बल 37 दशलक्ष टन कचरा महासागरात जाईल, असा अंदाज आहे. या कचर्यांत प्लास्टिकचे प्रमाण 37 टक्के इतके आहे. महासागराच्या किनारपट्टीवर एक मीटरपर्यंत सागरात 50 किलो कचरा असे प्रमाण सध्या मोजले गेले आहे.
0 टिप्पण्या