देवेंद्र फडणवीसांचा नव्या पर्वाला शुभेच्छा देण्यासाठी पुणे टीम मुंबईच्या दिशेने

 पुणे- 

उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपला पुन्हा एकदा राज्यात सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली आहे.

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या शक्यतेने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहर भाजपचे पदाधिकारी आज सकाळी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांचा नव्या पर्वाला शुभेच्छा देण्यासाठी हि टीम मुंबईच्या दिशेने निघाल्याचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आपल्या फेसबुक द्वारे म्हटले आहे.


दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. तर पुन्हा आपल्याला सरकार स्थापनेची संधी मिळणार म्हणून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपला जोरदार टक्कर देऊ आणि पुन्हा सत्तेत येऊ असा आशावाद महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी व्यक्त केला आहे, तर पुणे शहर भाजपने मात्र ठाकरे सरकार कोसळल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे.


आगामी काही दिवसात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका साठी निवडणुका होणार आहे. या निवडणुकीत महापालिका जिंकण्यासाठी याचा फायदा होणार असल्याने पुन्हा एकदा पालिकेतील सत्ता आपण मिळू असा विश्वास भाजपचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत. त्यामुळेच पुणे शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची एक टीम आज सकाळीच मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या