दोघे छिंदम भाऊ जिल्ह्यातून हद्दपार

 श्रीकांत व श्रीपाद छिंदम नगर जिल्ह्यातून हद्दपार




 छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांनाही अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले जाणार आहे. मागील काही महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल अहमदनगरमधील तोफखाना पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

सध्या श्रीपाद छिंदम त्यांच्यावर संघटीतपणे टोळी तयार करणे, गैरकायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी त्या दोघांवरही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याआधीही त्या दोघांवर अनेक गुन्हे दाखल केले गेले आहेत. जातीवाचक शिवीगाळप्रकरणीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अशा विविध कारणांमुळे त्यांच्यावर सतत पोलिसांकडून सूचना आणि कारवाई करण्यात येते. आताही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांनी टोळी तयार करण्यासारखे त्यांच्याकडून गुन्हे होत असल्याने पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या हद्दपारीचे आदेश काढले आहेत. या आदेशाबरोबरच छिंदम बंधूंविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अहमदनगरमध्ये छिंदम यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. गुंडगिरी करणे, तरुणांचे टोळकं कायम बरोबर घेऊन फिरणे अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्याकडून सतत होत असतात. मात्र ज्यावेळी छिंदमने महाराजांबद्दल अपशब्द काढले, तेव्हा लोकांनी छिंदम यांच्यासोबतच त्यांच्या साथीदारांच्या घरावरही दगडफेक केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या