....या कारणामुळे डॉ. विखे पाटील यांनी केले हे वक्तव्य
पारनेर तालुक्यातील परिस्थिती पाहीली तर सरकारी अधिकार्यांवर अनेकदा हल्ले होवूनही सदर लोकप्रतिनिधींवर कुठलीही कारवाई होत नाही. एकंदरीत तालुक्याची परीस्थिती बिहारसारखी झाली आहे. तालुक्यातील जनतेच्या हक्कासाठी व मदतीसाठी मी यापुढील काळात काम करत राहणार आहे. मतासाठी राजकारण न करता जनतेच्या हितासाठी तालुक्यात राजकारण मी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करणार असून विकासाच्या माध्यमातूनही काम करणार आहे.
पारनेर तालक्यातील वासुंदे येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दिव्यांग, अपंग, गरीब जेष्ठ व्यक्तींना जिवनावश्यक वस्तुंचे मोफत वाटप करण्यात आले. योजनेचा शुभारंभ खा. सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आला.
पारनेर तालुक्यात सत्तेच्या जोरावर लोकप्रतिनिधी प्रशासनाचा करत असलेला गैरवापर हा लोकतंत्रसाठी घातक असून, अतिशय चुकीच्या पद्धतीने तालुक्यात प्रशासकीय व पोलीस यंत्रणेचा वापर होत असून शिवसेना व भाजप तसेच विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांवर व पदाधिकार्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र या तालुक्यात चालू असून तालुक्यातील लोकप्रतिनिधी हे चुकीच्या पद्धतीने राजकारण करत आहेत. त्यामुळे या तालुक्यातील लोकप्रतिनिधींना जनताच आता त्यांचा खरा चेहरा उघड केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे प्रतिपादन वासुंदे येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेतील कार्यक्रमात खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष म्हणाले, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना आपल्या तालुक्यात राबवल्या जात असून वयोश्री योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दिव्यांग, अपंग, गरीब जेष्ठ व्यक्तींना या योजनेचा मोठा लाभ मिळत असून आपल्या पारनेर तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी असून हे मोठे पुण्याचे काम आहे.
वासुंदे येथे राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत नागरिकांना मोफत जीवनावश्यक साहित्य वाटप समारंभ खा. डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, युवा नेते सुदेश झावरे पाटील, जेष्ठ नेते सीताराम खिलारी, विश्वनाथ कोरडे, राहुल पाटील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या दरम्यान राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत टाकळी ढोकेश्वर येथे घेण्यात आलेल्या शिबिरातील टाकळी ढोकेश्वर, भोंद्रे, काकणेवाडी, तिखोल, ढोकी, वासुंदे, वडगाव सावताळ, गाजदीपुर, खडकवाडी, मांडवे खु., देसवडे आदी गावातील ज्येष्ठ लाभार्थ्यांना वासुंदे या ठिकाणी साई प्रसाद मंगल कार्यालयामध्ये मोफत साहित्य वाटप करण्यात आले.
पारनेर भाजप तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, पारनेर भाजप शहराध्यक्ष किरण कोकाटे, सभापती अरूण ठाणगे, पारनेर तालुका भाजप युवामोर्चा सरचिटणीस सागर मैड, महिला तालुकाध्यक्ष उषा जाधव दिलीप उदावंत, अॅड. बाबासाहेब खिलारी, भगवान वाळुंज, निजाम पटेल, खंडू भाईक, किसन धुमाळ, उपसरपंच शंकर बर्वे, भाऊ सैद, नारायण झावरे, रा. बा. झावरे, अमोल साळवे, संजय भोर, शुभम टेकुडे, अक्षय गोरडे, योगेश वाळुंज, बाळासाहेब पाटील, दिलीप पाटोळे, रणजीत पाटील, शरद पाटील बाळासाहेब झावरे, लहानु झावरे आदी उपस्थितीत होते.
0 टिप्पण्या