ऊस लागवड चालू असतानाच वीज पडल्याने महिलेचा मृत्यू

 उसाची लागवड करताना वीज पडून महिलेचा मृत्यू




पाटस : 
 
दौंड तालुक्यातील कानगाव येथे उसाची लागण करताना वीज अंगावर पडून शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशी माहिती पाटस पोलीसांनी दिली. सुवर्णो सोमनाथ कोऱ्हाळे (वय ४० ) असे या महिलेचे नाव आहे. 


कानगाव परिसरात रविवारी ( दिनांक २६) विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाच्या तोंडावर शेतकऱ्यांची उसाची लागवड व इतर पिकांची पेरणी करण्यासाठी लगबग सुरू आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या आसपास शेतकरी उसाची लागवड करीत असताना सुवर्णा कोऱ्हाळे यांच्या अंगावर वीज अंगावर पडल्याने मृत्यु झाल्याची घटना घडली.दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी मांडवगण फराटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशी माहिती पाटस पोलीस चुकीचे पोलीस हवालदार संजय देवकाते, पोलीस शिपाई समीर भालेराव यांनी दिली दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या