कृषी आयुक्तांचा शेतकऱ्यांनी अडवला ताफा

 



नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या कृषी आयुक्त धीरज कुमार  यांच्या ताफ्याची शेतकऱ्यांनी अडवणूक केली आहे.

जिल्ह्यात बोगस बियाणं, लिंकीग खतं आणि सोयाबीन पीक कापणी प्रयोग या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तांचा ताफा अडवला. त्यानंतर आयुक्त धीरज कुमार यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे एकूण घेतलं. तसेच याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देखील आयुक्तांनी शेतकऱ्यांना दिले आहे.

नामांकित केलेल्या सोयाबीनची उगवण क्षमता केवळ 10 ते 15 टक्के

कृषी विभागानं जे सोयाबीनचे नामांकित कंपन्याचे सॅम्पल घेतले होते. त्यांची उगवण क्षमता ही केवळ 10 ते 15 टक्के एवढी आहे. परंतू कृषी विभागानं अशा कोणत्याही कंपन्यावर कारवाई केली नाही. त्या मालाची विक्रीही थांबवली नाही. अनेक खतांचे बोगस नमुने आले आहेत. जिल्ह्यातून, तसेच आजूबाजूच्या भागातून शेतकरी खतं आणि बियाणे खरेदी करतात. परंतू अनावश्यक खते ही लिंकींग म्हणून देण्यात येत आहेत. त्याचा भूर्दंड शेतकऱ्यांवर पडत आहे. अर्धापूर तालुक्यातील पार्डी या ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तांचा ताफा अडवत आपलं गाऱ्हाणं मांडलं. या दरम्यान कृषी आयुक्त धीरज कुमार हे हदगांव येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना हा प्रकार घडला. त्यानंतर कृषी आयुक्तांनी शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून त्यावर कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक

यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीनं कृषी आयुक्त धीरज कुमार यांना एक निवदेन देण्यात आलं असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते संतोष गव्हाणे यांनी दिली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील कृषी विभागानं सोयाबीणच्या बियाणांचे सॅम्पल काढले होते. यामध्ये बऱ्याच नामांकित कंपन्यांचे बियाणे होते. पण हे सॅम्पल फेल गेले आहे. याची उगवण क्षमता 10 ते 15 टक्के एवढीच असल्याची माहिती संतोष गव्हाणे यांनी दिली. त्यांनतरही कृशी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीच कारवाई केली नाही. तसेच त्या मालाची विक्री देखील थांबवली नाही. असा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच 18:18:10 हा अनावश्यक असलेल्या खतांचे नमुने नांदेड जिल्ह्यात आले आहेत, त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती संतोष गव्हाणे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या