नेताजी उडाण फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद


स्वामी रामदासजी महाराज ; पढेगाव येथे महिलांसाठी मसाला प्रक्रिया केंद्र 
 

पढेगाव : येथील नेताजी सोशल फाउंडेशन व उडान फौंडेशन रणजीत बनकर व व जितेंद्र तोरणे हे नवयुवक गावासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करतात, आता तर त्यांनी गरजू महिलांसाठी मसाला प्रक्रिया उद्योगावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे तसेच त्यांना यासाठी लागणारे अर्थसाह्य ही ते उपलब्ध करून देणार आहेत. त्यांच्या पाठीशी आम्ही नेहमीच असणार आहोत परमेश्वराचे आशिर्वाद  त्यांच्या पाठीशी कायम राहतील असे प्रतिपादन हरियाणा कर्नाल येथील संत श्री श्री 108 श्री स्वामी रामदास जी महाराज यांनी केले.

अहमदनगर येथील जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र उडान फाउंडेशन व नेताजी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जेष्ठ नेते के वाय बनकर, मुळा प्रवरा वीज सोसायटीचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, अशोक कारखान्याच्या संचालिका मंजुश्री मुरकुटे,संचालक यशवंत बनकर, उडान फौंडेशनचे जितेंद्र तोरणे,पढेगाव सोसायटीचे अध्यक्ष रणजित बनकर अण्णासाहेब बनकर, भास्कर लिपटे, बापूसाहेब काळे, शरद बनकर, भाऊसाहेब कांदळकर, राजेंद्र तोरणे, भाऊसाहेब बनकर, अशोक बनकर, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय लिपटे, अँड प्रवीण लिपटे,राहुल  सप्रे ,अतुल लबडे विद्याताई क्षिरसागर,आरती पवार विद्या तोरणे,सुवर्णा बनकर, स्वाती बनकर ,पत्रकार प्रदीप आहेर,तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना रामदास जी महाराज म्हणाले नेताजी फाउंडेशनच्यावतीने यापूर्वी गावांमध्ये सुशिक्षित विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केली आहे त्या अभ्यासिकेमधून अनेक विद्यार्थी तयार झाले असून त्यातील काही विद्यार्थी उच्च अधिकारी पदापर्यंत पोहोचले आहेत गावामध्ये रस्त्याच्या कडेने दुतर्फा झाडे लावली असून त्या झाडांची देखभाल हे युवक करतात गावातील विविध सामाजिक धार्मिक कार्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो त्यामुळे आमचे आशीर्वाद नेहमी त्यांच्या पाठीशी राहतील असेही ते म्हणाले

यावेळी सिद्धार्थ मुरकुटे म्हणाले उडान फाउंडेशन व नेताजी सोशल फाउंडेशन यांचे कार्य उल्लेखनीय असून आज त्यांनी महिलांसाठी जो मसाले प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे हा उपक्रम स्तुत्य असून तालुक्यातील प्रत्येक मोठ्या गावांमध्ये असे कार्यक्रम घेण्यात यावेत त्यामुळे होतकरू महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होईल त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न मिटला जाईल यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे मुरकुटे मिळाले जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे म्हणाले जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवले जातात,त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मंजुश्री मुरकुटे,विद्या क्षीरसागर यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

जितेंद्र तोरणे मित्रमंडळाचे सुनील येसेकर,रविंद्र ढेपे, अण्णासो कांदळकर, मनोज पवार,इंजि. सागर तोरणे,संतोष बनकर, वाल्मीक येसेकर,जालिंदर ठोकळ,वसंत भालेराव तसेच इतरांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले. गरजू महिलांना या प्रशिक्षण शिबिरा संदर्भात सौ.प्रगती त्रिभुवन,सौ .योगिता रमेश जाधव यांनी माहिती दिली. सदर प्रशिक्षण शिबिर एक महिनाभर चालणार आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजित बनकर यांनी केले. तर जितेंद्र तोरणे यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन प्रवीण जमदाडे व प्रियंका यादव यांनी केले. 

अनुसूचित जाती-जमातीच्या तीस महिलांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली असून या महिलांना मसाला प्रक्रिया उद्योगाबाबत एक महिन्याचे मोफत प्रशिक्षण व प्रत्येकी विद्यावेतन दिले जाणार आहे जिल्हा उद्योग केंद्र प्रकल्प अधिकारी  तात्यासाहेब जिवडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या