रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी अंबानी पुत्र

 रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी अंबानी पुत्र आकाश 



रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी राजीनामा दिला असून त्यांचा मुलगा आकाश अंबानी यांची नियुक्ती रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी करण्यात आली आहे. मंगळवारी (२८ जून) रिलायन्स उद्योग समुहाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला.

रिलायन्सने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी रिलायन्सच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीतच रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी आकाश अंबानी यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली. 


२७ जूनला मुकेश अंबानी यांनी तात्काळ अंमलबजावणीच्या प्रभावाने राजीनामा दिला. यानंतर आकाश अंबानींच्या नियुक्तीचा निर्णय झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या