मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांची दुचाकी रॅली !

 बंडखोर आमदारांचा केला तीव्र शब्दांत निषेध!



पाटस :  

केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा केलेला डाव उधळून लावण्यासाठी सत्तापिपासू भाजपा व शिवसेनेतील बंडखोर गद्दारां विरुद्धचा लढा बळकट करण्यासाठी पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचया नेतृत्वाखाली चौफुला ते दौंड अशी दुचाकी रॅली काढण्यात काढली.

 दौंड तालुक्यातील शिवसैनिकानी मंगळवारी (दि.२८ ) वाखारी, केडगाव, चौफुला, वरवंड ,पाटस या गावांमधून दौंड शहरापर्यंत दुचाकीची रॅली काढली. शिवसैनिकांनी हातात भगवे झेंडे फडकावून तालुक्यातील चौका चौकांमधून निष्ठेला साथ..! गद्दारीला लाथ..! पाठीवर आमच्या बाळासाहेबांचा हात..! जागवले मावळे..! पेटवला वनवा..! गद्दारांना नमवून फडकवणार भगवा..! जय भवानी जय शिवाजी ! मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आगे बढो ! हम तुम्हारे साथ है ... शिवसेना अंगार है...बाकी सब भंगार है... या घोषणा देत ही रॅली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात येवुन धडकली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीचे सभेत रुपांतर झाले.


 याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल सोनवणे, शरद सुर्यवंशी,दौंड शहर प्रमुख आनंद पळसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आम्ही कोणाचे समर्थक नाही ...तर शिवसैनिक आहोत.‌‌..केलाच जयघोष तर आम्ही शिवसेनेचा जयघोष करू. गुवाहाटी मध्ये जाऊन पक्षाशी गद्दारी केलेल्या बंडखोरांच्या समर्थकांची निष्ठा त्यांच्या नेत्यांबरोबर विकली आहे. आम्ही शिवसैनिक नेहमी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहू असा निर्धार यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या