Breaking News

किरकोळ वादातून तलवारीने हल्ला

 


मांडवगण फराटा

शिरसगाव काटा (ता. शिरुर) येथील युवराज चव्हाण यांच्या घरातील मुलांना सोनू खैरे याने विनाकारण मारल्याने युवराज चव्हाण यांनी याबाबतचा जाब खैरे यांना विचारला त्यामुळे चिडून जाऊन सोनू खैरे, नीलकंठ खैरे यांसह आदींनी चव्हाण यांच्या घरी जात युवराज यांचे चुलते बाळासाहेब चव्हाण यांच्यावर तलवारीने हल्ला करत जखमी केले, दरम्यान युवराज चव्हाण व त्यांचे वडील बबन चव्हाण मध्ये गेले असता त्यांना देखील शिवीगाळ, दमदाटी करत तलवार व कत्तीने मारहाण केली, याबाबत युवराज बबन चव्हाण वय ४४ वर्षे रा. मानेमळा शिरसगाव काटा ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी सोनू नीलकंठ खैरे, नीलकंठ पोपट खैरे, सोनू तात्या कोळपे, सागर निळकंठ खैरे सर्व रा. शिरसगाव काटा ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साबळे हे करत आहे.

No comments