'त्या' वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी तिघे जेरबंद

 



 तालुक्यातील आपेगाव येथे पाच दिवसांपूर्वी झालेल्या वृद्ध दाम्पत्याच्या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी पढेगाव येथून तिघा आरोपींना जेरबंद केले. दरोड्याच्या उद्देशाने हत्याकांड झाल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले.
राधाबाई दत्तात्रय भुजाडे व दत्तात्रय गंगाधर भुजाडे अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा मुलगा जालिंदर भुजाडे हे नोकरीनिमित्ताने कुटुंबीयांसह पुणे येथे राहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 30 मे रोजी रात्री त्यांच्या आपेगाव येथील घराचे छत उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व आई राधाबाई व वडील दत्तात्रय यांचा खून केला. सामानाची उचकापाचक करून एक लाख 90 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

वृद्ध दाम्पत्याचा खून करून दरोडा...

http://dhunt.in/wd3IS?s=a&uu=0x09f9974672536c95&ss=pd


याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खून व दरोड्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर पाटील, पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणणे बाबत सूचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तीन विशेष पथके नेमून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. 



त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे संयुक्त पथक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती घेऊन तपास केला. त्यात कोपरगाव तालुक्यातील पडेगाव येथील अजय काळे (रा. पढेगाव ता. कोपरगाव) याने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.


पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस सब इन्स्पेक्टर सोपान गोरे, सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक, मोहन गाजरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, सुनील चव्हाण,पोलीस नाईक शंकर चौधरी, विशाल दळवी, राहुल सोळंकी, सचिन आडवल, संदीप चव्हाण, दीपक शिंदे, भरत बुधवंत पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, रोहित यमुल, रंणजीत जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन बेरड, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे तसेच कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड व पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख यांच्या पथकाने अजय छंदू काळे (वय वर्ष १९) याला पढेगाव येथून अटक केली. त्याचे साथीदार अमित कागद चव्हाण (वय वर्ष २० र. हिंगणी, ह. मु.पढेगाव) व जंतेश छंदु काळे ( वय वर्ष २२ र. पढेगाव) या दोघांना अटक केली. त्यांनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या