Breaking News

बीडमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला पाजले विष


बीड :
एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने विष पाजल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. 'माझ्याशी लग्न कर', असे म्हणत ऊसतोड कामगाराच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला, गावातीलच नराधम गावगुंडाने विष पाजले. यावेळी कुटुंबातील व्यक्तींनी वेळीच सतर्कता दाखवत, त्या गावगुंडाच्या तावडीतून मुलीला सोडवले. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या पीडितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना, बीडच्या गेवराई तालुक्यातील काजळवाडीमध्ये रात्री आठच्या दरम्यान घडली आहे.

नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा देणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी, आपले आई-वडील ऊस तोडणीसाठी कारखान्याला गेल्यानंतर चुलत्याकडे राहत होती. हीच संधी साधून गावातील गावगुंड असणारा एक २५ वर्षीय तरुण तिची छेड काढत असे. 'गेल्या दोन वर्षांपासून तो सतत तो छेड काढतोय, माझ्यासोबत लग्न कर, असं म्हणत तो सतत धमक्या देत होता.

शाळेत जाताना त्याने तिचा रस्ता अडवत होता. मात्र काल त्याने हद्दच पार केली. शेतातच राहणाऱ्या पीडितेच्या घरी तो गेला, 'माझ्यासोबत लग्न कर, असे म्हणत त्याने थेट विष पाजले'. यादरम्यान कुटुंबातील व्यक्तींनी वेळीच सतर्कता दाखवली आणि त्या गुंडांच्या तावडीतून आपल्या मुलीला सोडवले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वार्डात उपचार सुरू आहेत. दरम्यान तलवाडा पोलीसांकडून पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेवराई तालुक्यातील दिमाखवाडी, त्याचबरोबर गेवराई शहरात देखील रोडरोमिओंचा त्रासाला कंटाळून मुलींनी आत्महत्या केली आहे. तर काही दिवसांपूर्वीच अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील अल्पवयीन मुलीने गावातील रोडरोमिओंचा त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. या सर्व घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा गेवराई तालुक्यातील काजळवाडीमध्ये हा प्रकार उघड झाला आहे गेवराई तालुक्यातील काजळवाडीमध्ये हा प्रकार उघड झाल्याने, जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे अशा रोडरोमिओंवर कडक कारवाई करावी. अशी मागणी संतप्त बीडकरांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments