शिवसैनिकांनी सामुहिक शपथ घेऊन उध्दव ठाकरे यांना दर्शविला पाठिंबा

 उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिकांची आळंदीत घोषणाबाजी



आळंदी : 


शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज झाले आहेत.एकनाथ शिंदे हे 40 पेक्षाही जास्त आमदार घेऊन गुवाहाटी मधील एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत.एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्रमक झाले आहेत. राज्यात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी आंदोलन केले आहे. तिर्थक्षेत्र आळंदीत सुद्धा शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी घोषणाबाजी केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (नगरपरिषद चौक) येथे शिवसैनिकांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजी!, गद्दारांचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय! क्षमा नाही क्षमा नाही, गद्दारांना क्षमा नाही! महाराष्ट्र का नेता कैसा हो, उद्धव साहेब जैसा हो! अशा घोषणा देण्यात आल्या. प्राणात प्राण असेपर्यंत शिवसेनेसोबत व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहू अशी सामुहिक शपथ शिवसैनिकांनी घेतली.
यावेळी शिवसेना नेते उत्तम गोगावले,माजी नगराध्यक्ष रोहीदास तापकीर,शहरप्रमुख अविनाश तापकीर,माजी नगरसेवक रमेश गोगावले,आनंद मुगंसे,विश्वनाथ नेटके,अनिताताई झुजम,महीला विभाग प्रमुख मंगल हुंडारे,भागवत सोमवंशी,आशिष गोगावले,शशीराजे जाधव,तुषार तापकीर,मनोज पवार,बालाजी शिंदे,राहुल गोरे,अनिकेत डफळ,राहुल सोमवंशी,निखिल तापकीर,गणेश नेटके आदी शिवसैनिक या वेळी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या