देश हुकूमशाही कडे चालला आहे. म्हणून देशातल्या प्रत्येक नागरिकांनी सावध राहायची गरज

 


पुणे- 

जगाच्या पाठी वरती भारत देश हा सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे. याच्या मध्ये सत्ताधारी, विरोधक आहे ते अंकुश ठेवण्याचे काम करतात. परंतु देशातला सर्वात मोठा असलेला भारतीय जनता पक्ष हा सर्वच पक्ष गिळंकृत करायला पाहत आहे.

एकाला ही आपल्यासोबत ठेवायचं नाही म्हणून हा देश हुकूमशाही कडे चालला आहे. म्हणून देशातल्या प्रत्येक नागरिकांनी सावध राहायची गरज आहे. असा इशारा खासदार श्रीरंग बारणे यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी शिवसैनिकांना दिला. टिंबर मार्केट येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात शिवसेनेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बारणे बोलत होते.


पुढे ते म्हणाले की, पैशाच्या माध्यमातून सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून जो आपला होत नाही त्याला त्रास देण्याची भूमिका भाजपची आहे. काम करत असताना कुणाचा त्रागा कुणाच्या मनामध्ये असेल त्यांनी त्याची भावना व्यक्त केली पाहिजे. प्रत्येकाला न्यायची भूमिका आहे. परंतु त्यापरिस्थितीचा गैरफायदा घेऊन आजचे षड्यंत्र पक्षाविरोधात आणि ठाकरे कुटुंबीयांच्या विरोधात चालले आहे त्याला सर्वांनी सामोरे जायचे आहे. आपली एकी आपणच दाखवायची असा ही सल्ला बारणे यांनी शिवसैनिकांना दिला. तसेच आमदार सचिन आहिर यांनी आपल्या भाषणात सुरुवात करताना सांगितले की, "माझी तर परिस्थिती अशी झालीय की, मी तर पेढा खाल्ला पण नाही आणि कोणाला दिला पण नाही."


आणि सभागृहात एकच हषा पिकला..

अनेक लोकांनी आजच्या परिस्थितीवर वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण करण्याचे काम केलंय. आज जिल्ह्यामध्ये व शहरांमध्ये आपण जे मेळावे घेतोय याची सुरुवात या ठिकाणाहून केली जात आहे. उद्या पिंपरी चिंचवड आणि मावळ यादोन ठिकाणी बारणे यांच्या नेतृत्वाखाली पुढील बैठक होणार आहे. मात्र काही कारणास्तव त्यांना या बैठकीला उपस्थित राहता येणार नाही. आज संध्याकाळी शिरूर लोकसभा मतदार संघाची बैठक होणार आहे. उद्या बारामती लोकसभा या ठिकाणी देखील बैठक होणार आहे. या बैठका घेण्याचा उद्देश असा होता की निव्वळ काही राजकीय अस्थिरता पसरवण्याचे काम काही मंडळी आणि लोक करीत आहेत. यावेळी कार्यकर्ता खचता कामा नये, कार्यकर्ता खचलेला नाही, त्या कार्यकर्त्याला निव्वळ धीर द्यायचा नाही तर, त्या कार्यकर्त्यांकडून बळ घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पोचवण्यासाठी संपूर्ण जिल्हा विभागांमध्ये आज वेगवेगळ्या माध्यमातून का होईना मेळावे घेण्याचे प्रयत्न आपण करीत आहोत.


पुढे ते बोलताना म्हणाले की, वारकरी संप्रदाय महाराष्ट्राची संस्कृती जतन करत असताना पंढरपूरला वारी घेऊन निघाले आहेत. तर दुसरीकडे दुर्दैवाने म्हणावे लागेल एक संस्कृती अशी आहे की, महाराष्ट्राच्या लोकांची एक वेगळी राजकीय वारी घेऊन सुरत मध्ये जाऊन बसले आहेत. तर सुरत मध्ये जाऊन गोहाटीला जाण्याच्या मार्गाकडे आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या