मागील वर्षभरात 'एफडीए'ने विभागातील 105 मेडिकल स्टोअर्सचे परवाने रद्द केले, तर 392 स्टोअरचे निलंबन केले आहे. विविध नियमांचे पालन न केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मेडिकलवर कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मिळून 105 मेडिकल स्टोअर्सचे परवाने रद्द केले आहेत.
यापैकी सर्वाधिक कारवाई पुणे जिल्ह्यात केली असून, त्यामध्ये 195 जणांचे निलंबन, तर 68 जणांचा परवाना रद्द केला आहे. पुणे विभागात म्हणजे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये ही कारवाई झाली असून, सर्व जिल्ह्यात मिळून एकूण 2 हजार 325 स्टोअर्सचे 'केआरए" (मूलभूत नियम) तपासण्यात आल्याची माहिती सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी दिली. कोल्हापूरमध्ये 346 स्टोअर्स तपासण्यात आले. त्यातील 65 जणांचे निलंबन, तर 14 जणांचे परवाने रद्द करण्यात आले. सांगली येथे 264 मेडिकल तपासण्यात आले. त्यातील 81 जणांचे निलंबन, तर 12 जणांचे परवाने रद्द करण्यात आले. सातारा येथे 245 पैकी 16 जणांचे निलंबन, तर एकाचा परवाना रद्द केला. सोलापूरमध्ये 173 केआरए तपासले, त्यातील 35 जणांचे निलंबन केले, तर 10 जणांचे परवाने रद्द केले आहेत.
0 टिप्पण्या