सोसायटीची निवडणूक बिनविरोध; पदाधिकारी निवडीने मात्र राजकारण तापले

 कै.नामदेवराव नवले सोसायटीची निवडणूक बिनविरोध; 
पदाधिकारी निवडीने मात्र राजकारण तापले 



अध्यक्षपदी रवींद्र नवले; दशरथ मापारे उपाध्यक्ष


नेवासा तालुक्यातील  भेंडा खुर्द येथील कै. नामदेवराव नवले पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच पार पडली. सत्ताधारी गटाच्या एक दिवसाच्या सहलीनंतर तेरापैकी आठ मते मिळून अध्यक्षपद मिळवण्यात ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काशिनाथ नवले यांचे चिरंजीव रविंद्र नवले यांना यश आले. उपाध्यक्षपदी दशरथ मापारे यांची निवड झाली. बिनविरोध निवडणुकीनंतर पदाधिकारी निवडीने मात्र राजकारण शिगेला गेले.


राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पडली. तथापि, पदाधिकारी निवडीवरून नाराज झालेले सत्ताधारी गटातील संचालक रोहन विजयकुमार नवले व विरोधी गटातील अर्जुन बाजीराव नवले यांनी पदाधिकारी निवडीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. अध्यक्षपदासाठी रविंद्र नवले व गोरक्ष सुखदेव नवले यांनी अर्ज भरले. तर उपाध्यक्षपदासाठी दशरथ जमन मापारे व दामू रंगनाथ महापुर यांनी अर्ज भरले. रोहन नवले व अर्जुन नवले मतदानास उपस्थित न राहिल्याने 13 पैकी 11 संचालकांनी मतदान केले. त्यात अध्यक्षपदी रविंद्र नवले व उपाध्यक्षपदी दशरथ मापारी यांची प्रत्येकी आठ मते मिळून निवड झाली. गोरक्षनाथ नवले व दामु महापुर यांना अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी तीन मते मिळाली. निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर पदाधिकारी निवडीत राजकारण तापल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

निवडीसाठी राधाकिसन भागवत, मच्छिंद्र धनवडे, गणेश नवले, गोरख चौधरी, मच्छिंद्र शिंदे, रुपाली नवले, गंगुबाई मोरकर उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून पी.के. खेडेकर व सचिव गणेश भुजबळ यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या