बारावीचा निकाल जाहीर, यंदाही याच विभागाने मारली बाजी

बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 94.22 टक्के यंदाही कोकण विभागाने मारली बाजी




महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून  मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल  आज जाहीर झाला आहे.
दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. तसेच मोबाइलवरही एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाहता येणार आहे. निकाल ऑनलाईन जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभाग अव्वल, कोकण विभागाचा निकाल 97.21% इतका लागला आहे. निकालात यंदाही मुलींची बाजी यंदाच्या वर्षाच्या निकालात ही मुलींची बाजी.विद्यार्थिनींचा एकूण निकाल 95.35 टक्के तर विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 93.29 टक्के इतका लागला आहे. 24 विषयांचा निकाल 100 % एकूण 153 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के इतका लागला आहे.

यंदा ७५ टक्के लेखी अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. तर किमान ४० टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली होती. तसेच तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रकल्प यासाठी दोन कालावधी देण्यात आले होते. तसंच ७० ते १०० गुणांच्या प्रश्न पत्रिकांसाठी यंदा ३० मिनिटं जादा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. तर ४० ते ६० गुणांच्या प्रश्न पत्रिकांसाठी १५ मिनिटं जादा वेळ देण्यात आला होता. शाळा तिथं परीक्षा केंद्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं. बारावीच्या निकाल यंदाही मुलींनी बाजी मारली असून ९५.३५ टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ९३.२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


विभागनिहाय निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.
कोकण- ९७.२१ टक्के
पुणे- ९३.६१ टक्के
नागपूर- ९६.५२ टक्के 
औरंगाबाद- ९४.९७ टक्के
मुंबई- ९०.९१ टक्के 
कोल्हापूर- ९५.०७ टक्के 
अमरावती- ९६.३४ टक्के
नाशिक- ९५.०३ टक्के 
लातूर- ९५.२५ टक्के

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या