डबल ढोलकी वाजवणारांनी शिवसेनेतून बाहेर जावं ! विजय औटींनी घरभेदींना फटकारले....

 पारनेर : 

तालुक्यातील सुपा येथे शिवसेना पक्षाच्या वतीने दूसर्‍या टप्प्यातील शिवसंपर्क अभियान आयोजित केले होते. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, काही लोकांना असे वाटतंय की मी दिवसा काय करतोय व अंधारात काय करतोय हे कोणाला समजत नाही. अशा लोकांनी कृपा करुन शिवसेने मधुन निघून जावे. पक्षामधे राहुन आमच्या पक्षाची अडचण करु नका. मी नसेल तर शिवसेनेला उमेदवार मिळणार नाही असे काहीजण सांगत आहेत. उमेदवार नाही असे होणारही नाही आणि उमेदवार नसेल तर मतदासंघ सोडून देेईल पण अशा चुकीच्या माणसांना कदापी उमेदवारी देणार नाही. अशा शब्दामधे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी पक्षातील घरभेदींना फटकारले. यावेळी आमदार निलेश लंके यांच्यावरही त्यांनी टिका केली. 
   शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामधे शिवसेनेच्या पक्ष निरीक्षकांनी विविध गटांमधील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. सुपा येथे  कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी खासदार गजनान किर्तीकर हे उपस्थित होते. 
    
     मीसुध्दा १५ वर्षे  लोकप्रतिनिधी होतो. पण कधीही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिलेला नाही. या निवडणूकी मधे अडचण झाली. आपल्यातलंच एक जित्राब तिकडं गेल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. ते आमदार आमदार म्हणुन सध्या रात्री बेरात्री फिरत आहेत. आपल्यासमोर इथं एकही टिकणारा नव्हता, त्यामुळे आपलंच उचललं आणि तिकडं नेलं. मी शिवसेना संपवून टाकील अशी भाषा ते करीत आहेत. अशी टिका विजय औटी यांनी आमदार निलेश लंंके यांचे नाव न घेता केली. 

याप्रसंगी संपर्क प्रमुख भाऊ कोरगांवकर,अहमदनगर जिल्हापरीषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दातेसर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, सभापती गणेश शेळके,महिला आघाडी तालुका प्रमुख प्रियंका खिलारी,युवासेना तालुका प्रमुख नितिन शेळके,सेनेचे पारनेर शहर प्रमुख निलेश खोडदे यांच्यासह सुपा गटातील कार्यकर्ते बहुसंखेने हजर होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या