जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांची थोरल्या पादुका मंदिरास भेट

 


आळंदी / प्रतिनिधी :

 पुणे आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरास पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरास सदिच्छा भेट दिली.
  यावेळी त्यांचे स्वागत व सत्कार श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर  ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांनी केले. पुणे जिल्हा न्यायाधिश संजय देशमुख यांनी थोरल्या पादुका मंदिरास भेट देऊन मंदिरातील श्री विठ्ठल रुख्मिणी व माऊलींचे मूर्तीचे व पादुकांचे दर्शन घेतले.तसेच यावेळी मंदिरात भजन सुरु असताना त्यांनी काही वेळ थांबून भजनाचा मनमुराद आनंद घेतले. भजन प्रसंगी भाविक, वारकरी यांना संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे जीवन चरित्रावर आधारित माहिती दिली. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांनी जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख , सहधर्मादाय आयुक्त सुधीर कुमार बुक्के, पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष पांडुरंग थोरवे यांचा ट्रस्ट तर्फे शाल,श्रीफळ व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वारकरी व भाविक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या