हवाई दलात नोकरीच्या आमिषाने तरुणाची दहा लाखांची फसवणूक: एकास अटक

 


पुणे :
  हवाई दलात नोकरीच्या आमिषाने तरुणाची तब्बल दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली.

तानाजी कृष्णा पाटील (वय ३२, रा. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पाटीलचे साथीदार सुबोध प्रभाकर सरपटवार (वय ५९, रा. वाडेगाव) आणि सदानंद कर्मवीर बाने (रा. कोल्हापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण योगराम मेश्राम (वय २३, रा. गोंदिया) याने या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मेश्राम याला हवाई दलात नोकरीचे आमिष आरोपींनी दाखविले होते. मेश्राम याच्याकडून आरोपींनी वेळोवेळी दहा लाख रुपये घेतले. त्यानंतर मेश्रामने पाटील आणि त्याच्या साथीदारांशी संपर्क साधला. तेव्हा आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली.

पोलिसांनी तपास करुन पाटील अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी पाटीलला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील ॲड. विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने पाटीलला दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या