कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन थेट परीक्षेलाच बसतात विद्यार्थी... असा आला प्रकार उघडकीस...

 

अकरावी तसेच पदवी अभ्यासक्रमासाठी काही महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन थेट परीक्षेलाच बसण्याची संधी दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस.....




अकरावी तसेच पदवी अभ्यासक्रमासाठी काही महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन थेट परीक्षेलाच बसण्याची संधी दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांची प्रवेशाची लगबग सुरू आहे. गुणवत्ता जोपासणार्‍या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. मात्र, काही महाविद्यालयांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. त्यातील काही महाविद्यालये असे आमिष दाखवत आहेत.


नोकरी, व्यवसाय अथवा खासगी संस्थेमध्ये कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे तसेच विविध प्रवेश परीक्षांचा अभ्यास करीत महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. अशा विद्यार्थ्यांना आकर्षित करून त्यांना प्रवेशित करण्याचे काम काही महाविद्यालयांकडून सुरू आहे. प्रवेश घ्यायचा अन् थेट परीक्षेलाच महाविद्यालयात जायचे, असा प्रकार वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी पिटपडताळणी तपासणी मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे.


उपस्थितीची अनिवार्यता नावालाच…


परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांची महाविद्यालयात 75 टक्के उपस्थिती
अनिवार्य आहे. मात्र, महाविद्यालय पातळीवर कागदोपत्री सर्व काही मॅनेज करून विद्यार्थ्यांची योग्य उपस्थिती दाखविण्यात येते आणि विद्यार्थी परीक्षेला बसतात. त्यामुळे उपस्थितीची अनिवार्यता नावालाच असल्याचे चित्र आहे.




स्वायत्त महाविद्यालयांमध्ये वर्षभरात दोन मुख्य परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या तीन परीक्षा, यासह साधारण आठ परीक्षा होतात. तर, पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये देखील तीन ते चार परीक्षा होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.
– डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या