सीओईपी अभियांत्रिकी महाविद्यालय 'बाटूत' जाणार

 


राज्यातील आकृती विद्यापीठांशी संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठात (बाटू) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

याअंतर्गत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी) हे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय गुरुवारी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. 


आता राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना 'बाटू'चे संलग्नीकरण घ्यावे लागणार आहे. त्यामुळे हळूहळू सर्व महाविद्यालये तंत्रशास्त्र विद्यापीठाचे संलग्नीकरण घेत असल्याचे दिसत आहे. त्यातूनच सर्वप्रथम शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश करण्यावर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा भर आहे. यामध्ये सीओईपीचा समावेश करण्यात आला आहे.

लोणेरे येथे तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन झाल्यावर त्यामध्ये सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये सामील व्हावी असा मानस व्यक्त करण्यात आला होता. काही वर्षांपासून राज्यातील बहुतांश महाविद्यालये त्यात जाण्यासाठी इच्छुक नव्हती. मात्र, आता त्याचे संलग्नीकरण आवश्‍यक करण्यात आल्याने सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालयांना संलग्नीकरण घ्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे 'बाटू'ला विभागनिहाय उपकेंद्रासाठी जागाही देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या