शिवसेनाला आणखी एक धक्का : तंत्रशिक्षण मंत्री गुवाहाटीला रवाना

 


शिवसेनेला आणखी एक धक्का सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील आता गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. उदय सामंत हे शनिवारी शिवसेना भवन येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला देखील उपस्थित होते. त्यानंतर आता उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याची माहिती समोर आली आहे.

 एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी होणारे उदय सामंत हे महाराष्ट्रातील आठवे मंत्री आहेत. शिवसेनेचे कोकणातील प्रमुख नेते असलेल्या उदय सामंत यांनी शनिवारी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद असल्याने शंका उपस्थित झाली होती. मात्र आता ते गुवाहाटीला पोहचल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटात आणखी एका शिवसेना आमदाराचा समावेश झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या