पुणे-
सोमवारी घाट माथ्यासह शहर व परिसराला रेड अलर्ट देण्यात आला असून, दिवसभर मोठ्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, 14 जुलैपर्यंत शहरात मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या चार दिवसांपासून शहरात संततधार पाऊस सुरू असून, रविवारी दुपारनंतर शहरातील सर्व भागांत जोरदार पाऊस झाला.
त्यामुळे जूनमध्ये अवघ्या 34 मिमीवर असणार्या हंगामातील पावसाने 150 मिमीचा टप्पा रविवारी पार केला. आगामी चार दिवसही मोठ्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. सोमवारी, दि.11 रोजी शहराला रेड अॅलर्ट देण्यात आल्याने पुणे वेधशाळेने सावधानतेचा इशारा दिला
0 टिप्पण्या