अलिबाग- रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तळा येथे सर्वाधिक 245 मिलिमीटर पाऊस पडला आहे. माणगाव येथे 230 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाड येथे 188 मिलिमीटर, ते पोलादपूर येथे 169 मिलिमीटर, पनवेल येथे 172 मिलिमीटर, उरण येथे 146 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मुसळधार पावसामुळे काल रात्री नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली होती, मात्र पावसाचा जोर विसरल्याने सकाळी नद्यांची पातळी घालवली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील गावांचा धोका टळला आहे. दरम्यान आजही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
0 टिप्पण्या