31 पोलीस निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षकांच्या झटक्यात अंतर्गत बदल्या

 
पुणे- 

पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळित राखण्यासह वाहतूक विभागावरही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार त्यांच्या आदेशाप्रमाणे वाहतूक उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी विभागातील 31 पोलीस निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षकांच्या झटक्यात अंतर्गत बदल्या केल्या आहेत.

एकाच दणक्यात संपुर्ण वाहतूक विभागातील बदल्या केल्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.


वाहतूक विभागातील काही अधिकारी मागील काही महिन्यांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचे दिसून आले होते. विशेषतः परिसरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात नव्हते. त्यामुळे संबंधितांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. वारंवार वाहतूककोंडी संदर्भात तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक उपायुक्त राहूल श्रीरामे यांना अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी वाहतूक विभागातील 31 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नवनियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी वाहतूककोंडी सोडविण्यावर भर देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.


नवनियुक्त वाहतूक विभाग अधिकाऱ्यांनी नावे

पद- अधिकाऱ्याचे नाव - वाहतूक विभाग नियुक्तीचे ठिकाण

पोलीस निरीक्षक -ए. एस. तोरडमल - सिंहगड रोड

पोलीस निरीक्षक -डी.बी. चुडाप्पा - भारती विद्यापीठ
पोलीस निरीक्षक -ए.बी. शेवाळे - स्वारगेट
पोलीस निरीक्षक-व्ही.टी. पाटील-वंâट्रोल
पोलीस निरीक्षक-ए. एन. हजारे-वानवडी
पोलीस निरीक्षक-व्ही. एस. साळुंखे- लोणीकाळभोर
पोलीस निरीक्षक-यु.बी. शिंगाडे-वंâट्रोल
पोलीस निरीक्षक-बी.यु.शिंदे-कोथरूड
पोलीस निरीक्षक- जे. यु.पायगुडे- येरवडा
पोलीस निरीक्षक-के. बी. बालवडकर-शिवाजीनगर
पोलीस निरीक्षक -पी.डी. मासाळकर- खडकी
पोलीस निरीक्षक-एम. एन.शेळके-फरासखाना
पोलीस निरीक्षक-आर.डी. शेळके-कोंढवा
पोलीस निरीक्षक-ए.एस. लकडे-हडपसर
पोलीस निरीक्षक-डी.टी. करचे-लष्कर
पोलीस निरीक्षक-एस.डी.सोनवणे-विमानतळ
पोलीस निरीक्षक-एस.एम.झेंडे-बंडगार्डन
पोलीस निरीक्षक-ए.डी.दळवी-वंâट्रोल
पोलीस निरीक्षक-ए.एन.पवार-दत्तवाडी
पोलीस निरीक्षक-आर.जे. सरवदे-खडक
पोलीस निरीक्षक-बी.डी. कोळी- चतुःशृंगी
पोलीस निरीक्षक-एस.व्ही.भोसले-मुंढवा
सहायक पोलीस निरीक्षक-वाय.बी.खटके-कोरेगाव पार्क
सहायक निरीक्षक-देवकर- विश्रामबाग
सहायक निरीक्षक-जे.एन.पाटील- लोणीकंद
सहायक निरीक्षक-बी.डी.साळुंखे-हांडेवाडी
सहायक निरीक्षक-बी. आर.आडके-समर्थ
सहायक निरीक्षक-बी. एम. मुऱ्हे-सहकारनगर
सहायक निरीक्षक-ए.एन.घुले- डेक्कन
सहायक निरीक्षक-व्ही.ए.पवार-वारजे
सहायक निरीक्षक-व्ही. के.थोरात-कंट्रोल


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या