450 नवीन महाविद्यालये राज्य सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत

 


450 नवीन महाविद्यालये राज्य सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत.विद्यापीठ अधिनियमानुसार या महाविद्यालयांना 15 जुलैपर्यंत परवानगी न दिल्यास ती थेट पुढच्या वर्षी सुरू करावी लागणार आहेत. त्यामुळे नव्या सरकारने तातडीने या महाविद्यालयांना परवानगी द्यावी, अशी मागणी पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालयांना तत्काळ मान्यता देण्याची गरज असल्याचे आमदार डावखरे यांनी पत्रात नमूद केले आहे. राज्य सरकारने नवी महाविद्यालये सुरू करण्यासाठी 15 जुलैपर्यंत प्रस्ताव मागवले होते. त्यानुसार राज्यभरातून 450 नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. विद्यापीठ अधिनियमानुसार नव्या महाविद्यालयांना 15 जुलैपूर्वी मान्यता द्यावी लागते.

सध्या शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, नव्या महाविद्यालयांना सरकारची परवानगी न मिळाल्याने महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देता येत नाहीत. त्यामुळे त्या भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. येत्या 15 जुलैपूर्वी प्रस्ताव सादर केलेल्या महाविद्यालयातील पात्र ठरलेल्या महाविद्यालयांना मंजुरी मिळाल्यास, त्या भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी येणार नाहीत, असे सांगत महाविद्यालयांना 15 जुलैपूर्वी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, संस्थाचालकांनीही राज्य सरकारकडे महाविद्यालयांना परवानगी देण्यासाठीचा आग्रह धरला आहे.


राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत नव्या महाविद्यालयांना परवानगी देण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. सरकार बदलल्याने सध्या या विभागाला अजून मंत्री मिळालेला नाही. त्यामुळे याबाबतचे सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांनाच घ्यावे लागणार आहेत. 15 जुलैपूर्वी हा निर्णय न झाल्यास या महाविद्यालयांमध्ये या वर्षी विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. अशा वेळी मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे नव्या महाविद्यालयांचे लक्ष लागून राहिले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या