8 जुलै रोजी शहराला अतिवृष्टीचा इशारा

 

पुणे शहरात पावसाने जून महिन्यात ओढ दिली असली, तरीही 5 जुलै पासून पाच दिवस शहरासह संपूर्ण परिसराला मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. 8 जुलै रोजी शहराला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

सोमवारी सकाळीच शहरात चांगला पाऊस झाला. दुपारी 1 नंतर पुन्हा रिमझिम पाऊस पडत होता. शहरात 5 जुलै ते 10 जुलैपर्यंत मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त राहणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून, सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिवाजीनगर 1.8 मिमी, पाषाण 3.4 मिमी, लोहगाव 1.2 मिमी, चिंचवड 1 मिमी, लवळे 3.5 मिमी, मगरपट्टा 5 मिमी पाऊस पडला आहे.


शहराच्या कमाल तापमानात जूनमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत होती. 30 जूनपर्यंत शहराचे तापमान 35 अंशांवर गेले होते. मात्र, गेल्या तीन दिवसांत कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी घट झाली आहे. सोमवारी शहराचे कमाल तापमान 22.2 अंशांपर्यंत खाली गेले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या