शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांनी भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केली. विधानसभा अधिवेशनात बहुमत चाचणीतही फडणवीस-शिंदे सरकारने विजय मिळवला. यानंतर शिवसेना भवनात जिल्हा प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून शिवसेनेची बांधणी आणि रणनीती याविषयी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूकीवर लक्ष
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूड पडली होती. शिंदेना शिवसेना आणि अपक्ष मिळून जवळजवळ ५० आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले. त्यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केली. येत्या काही दिवसांमध्ये मुंबई, ठाणे महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे. आमदरांच्या या बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसू नये यासाठी शिवसेना तयारीला लागली आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुखांकडून आढावा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेना बंडखोर आमदारांची संख्या ४० वर
शिवसेनेविरोधात बंड पुकारणाऱ्या आमदारांमध्ये आज सकाळी आणखी एका आमदाराची भर पडली. उद्धव ठाकरे गटातील आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले. शिंदे सरकारने १६४ विरुद्ध ९९ च्या फरकाने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेच्या अध्यक्षांची निवड आणि शिंदे सरकारविरोधातील विश्वास दर्शक ठराव या दोन्ही वेळेस ज्यांनी व्हिपचं उल्लंघन केलंय त्यांच्यावर कारवाई होणार हे नक्की आहे असं, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. शिवसेनेच्या व्हीपवरुन शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आमने-सामने असून प्रकरण सर्वोच्च न्यायलयामध्ये न्यायप्रविष्ठ आहे. ११ जून रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.
0 टिप्पण्या