पंतप्रधान आवास योजनेच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू

 


पंतप्रधान आवास योजनेच्या ऑनलाईन सोडतीतील प्रतीक्षा यादीतील नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू पंतप्रधान आवास योजनेच्या ऑनलाईन सोडतीतील प्रतीक्षा यादीतील नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाकडून 18 जुलैपासून ही कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित रिक्त घरांचे वाटप करण्यात येणार आहेत.


पुणे महानगरपालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची खराडी, हडपसर व वडगाव येथील पाच गृह प्रकल्पांकरिता एकूण 1 हजार 30 रिक्त सदनिकांची पुन्हा ऑनलाईन सोडत नुकतीच झाली. या ऑनलाईन सोडतीमधील विजेते लाभार्थी कागदपत्रे पडताळणीकरिता सावरकर भवन येथे उपस्थित राहिले नाहीत.


त्यामुळे विजेता लाभार्थी येथील सदनिका घेण्यास इच्छुक नाही, असे गृहीत घरून प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना प्राधान्यक्रमाने सदनिका वितरित करण्यात येणार आहेत. प्रतीक्षा यादीमधील लाभार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी दि. 18 जुलै 2022 सकाळी 10 पासून सुरू केली जाणार आहे.


कागदपत्रे पडताळणीकरिता लाभार्थ्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचा दाखला (लागू असल्यास), उत्पनाचा दाखला (तहसीलदार), रहिवासी दाखला (भाडे करार, लाईट बिल, रेशन कार्ड, बँक पासबुक इ.), प्रतिज्ञापत्र, सह-अर्जदार, अर्ज प्रतीक्षा यादीमधील लाभार्थ्यांनी दि. 04 ते 17 जुलै 2022 रोजी पर्यंत ही सर्व कागदपत्रे घेऊन सावरकर भवन येथे उपस्थित राहावे, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या