Breaking News

ओबीसींच्या राजकीय आरक्षण आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा होणारच: बाळासाहेब थोरात

अहमदनगर: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत थोरातांनी आनंद झाल्याचं म्हटलं. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आरक्षणाच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसींना राजकिय आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडीचा सातत्याने प्रयत्न सुरू होता.. त्यासाठी नेमलेल्या बांठीया आयोगाच्या अहवालावरून आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचा आनंद झाल्याचं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं. तसेच "लोकशाही टिकवायची असेल तर कायद्याने राज्य पुढ गेल पाहिजे. माननीय सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च असल्यानं योग्य न्याय होईल अशी अपेक्षा आहे",अशी प्रतिक्रिया थोरात यांनी शिवसेना आमदार अपात्रेबाबत सुरू असलेल्या सुनावणी बाबत


दिली आहे.

No comments