बूस्टर डोस घ्यावा लागणार एवढ्याच कालावधीत

आता दुसर्‍या डोसनंतर 9 महिन्यांऐवजी



 6 महिन्यांनी घेता येणार बूस्टर  डोस


पुणे- 

कोरोना प्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस घेण्यासाठीच्या नियमांमध्ये सरकारने बदल केला आहे. 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस आता दुसर्‍या डोसनंतर 9 महिन्यांऐवजी 6 महिन्यांनी घेता येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समूहाने (एनटीएजीआय) सरकारकडे कोरोना प्रतिबंधक लशीच्या बूस्टर डोसच्या कालावधीसंदर्भात शिफारस केली होती.


याशिवाय समूहाने 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनाही कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस देण्यासंदर्भात शिफारस केली आहे. 12 ते 17 वयोगटातील मुलांचे लसीकरण कमी प्रमाणात झाले आहे. या वयोगटातील मुलांना अधिक धोका असल्याचे निदर्शनास आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या