पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला: पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ल्याचा कट बिहार पोलिसांनी उधळला आहे. पाटण्यात केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यातील एकजण माजी पोलीस अधिकारी असल्याचं समोर आलंय. या कटानुसार भारताला २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा कट रचला जात होता. याचाच भाग म्हणून पंतप्रधान मोदींना १२ जुलैच्या दौऱ्यात लक्ष्य करण्याच्या कटाचाही समावेश होता. अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांची नावं अथर परवेज व मोहम्मद जलालुद्दीन अशी आहेत.
0 टिप्पण्या