अशी आहे राहाता , संगमनेर, कर्जत पंचायत समिती आरक्षण सोडत




जिल्हा परिषद गटव पंचायत समिती गणांसाठी आज (गुरूवार) आरक्षण सोडत आज झाली आहे, प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या गटांची, तर संबंधित तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत झाली आहे. चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत होणार असल्याने इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने तातडीने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.


संगमनेर पंचायत समिती आरक्षण. सोडत जाहिर

१) घुलेवाडी गण  --अनुसूचीत जाती (SC)

२) जोर्वे गण ---अनुसूचीत जाती महिला (SC)

३)साकुर गण --अनुसूचीत जमाती (St)

४) अंभोरे गण -- अनुसूचीत जमाती महीला (ST)

५)निमोण गण -- ना.म.प्र.व्यक्ती (OBC)

६) समनापुर गण -- ना.म.प्र.महिला ( OBC)

७) तळेगाव गण -- ना.म.प्र.महिला (OBC)

८) आश्वी खु.गण --ना.म.प्र.महिला.(OBC)

९)वडगाव पान गण --ना.म.प्र.व्यक्ती ( OBC)

१०) कोकणगाव गण -- सर्वसाधारण व्यक्ती open

११)आश्वी बु गण --सर्वसाधारण व्यक्ती open

१२) संगमनेर खुर्द गण --सर्वसाधारण व्यक्ती open

१३) गुंजाळवाडी गण --सर्वसाधारण महिला open

१४) राजापूर गण --सर्वसाधारण महिला open

१५)धांदरफळ गण --सर्वसाधारण व्यक्ती open

१६) चंदनापुरी गण -- सर्वसाधारण महीला  open

१७) पेमगीरी गण -- सर्वसाधारण महिला open

१८) वरवंडी गण --सर्वसाधारण व्यक्ती open

१९) खंदरमाळवाडी गण --सर्वसाधारण व्यक्ती open

२० )बोटा गण --सर्वसाधारण महिला open


राहाता पंचाययत समिती गण आरक्षण सोडत

सावळीविहीर बु      नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला

पुणतांबा     अनु जमाती महिला 

  वाकडी     सर्वसाधारण        

अस्तगाव   नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

निमगांव को-हाळे  अनु जाती महिला

 साकुरी     सर्वसाधारण महिला

 पिंपरी निर्मळ    नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 

  बाभळेश्‍वर  सर्वसाधारण महिला

  लोणी खु      सर्वसाधारण

  लोणी बु   सर्वसाधारण

 कोल्हार  सर्वसाधारण

 दाढ बु    अनु जाती


  कर्जत पंचायत समितीच्या १० गणासाठी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत संपन्न झाली. यामध्ये १ अनुसूचित जाती महिला, १ नामाप्र महिला तर सर्वसाधारण महिलेसाठी ३ गण आणि सर्वसाधारण जागेसाठी ४ असे आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षण सोडतीने अनेक राजकीय गणिते जुळविण्याची प्रक्रिया सर्व राजकीय पक्षात सुरू झाली आहे. सर्वच गणात इच्छुकांची भाऊगर्दी पहावयास मिळेल.

           कर्जत पंचायत समितीच्या १० गणासाठी गुरुवार, दि २८ रोजी कर्जत तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या निर्देशानुसार प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत संपन्न झाली. गणनिहाय आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे :  निमगाव गांगर्डा - सर्वसाधारण महिला, मिरजगाव - सर्वसाधारण महिला, चापडगाव - सर्वसाधारण, टाकळी खंडेश्वरी - सर्वसाधारण महिला, कोरेगाव - सर्वसाधारण, आळसुंदे - नामाप्र स्त्री, कुळधरण - अनुसूचित जाती महिला, बारडगाव सुद्रीक - सर्वसाधारण, राशीन - सर्वसाधारण आणि भांबोरा नामाप्र असे आरक्षण सोडत संपन्न झाली असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे. यावेळी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, निवासी नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांच्यासह राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या