जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन, शैक्षणिक संस्था, औषधनिर्माण शास्त्राच्या कंपन्या, माहिती तंत्रज्ञानाच्या कंपन्यांसह व्यवसायाची मोठी संधी उद्योजकांना आहे,' असे मत जम्मू-काश्मीरच्या उद्योग आणि वाणिज्य विभागाच्या संचालिका अनु मल्होत्रा यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने 'जम्मू-काश्मीरमधील औद्योगिक स्थिती' या विषयावर मल्होत्रा यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या. काश्मीरचे उद्योग आणि वाणिज्य विभागाचे मेहमूद शहा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जम्मूचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस डॉ. सुजित तांबडे उपस्थित होते.
मल्होत्रा म्हणाल्या, 'जम्मूमध्ये बॉलिवूडमुळे व्यवसायाला गती मिळत आहे. या ठिकाणी अनेक भागांतील जमिनी व्यवसायासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. औषधनिर्माण शास्त्राच्या 50 कंपन्या स्थापन झाल्या आहेत. येथील खासगी जमिनी भाड्याने घेऊन व्यवसायाची संधी आहे. पर्यटनस्थळी हॉटेलमध्ये व्यवसायासाठी सामंजस्य करार होत आहेत तसेच नैसर्गिक ठिकाणांवर साहसी खेळांसाठी व्यवसायामुळे रोजगारात वाढ होत आहे.'
आयटी, फार्मा कंपन्यांच्या व्यवसायात वाढ
जम्मू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही शैक्षणिक संस्था, आयटी कंपन्या तसेच फार्मा कंपन्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नव्याने या ठिकाणी रिंग रस्ता तयार होत आहे. त्यामुळे या ठिकाणी व्यवसाय करण्याची मोठी संधी असून, व्यवसाय करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन जम्मू-काश्मीरच्या उद्योग आणि वाणिज्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विवेक भारद्वाज यांनी केले आहे.
0 टिप्पण्या