उतार्यावर क्यूआर कोड देण्यात येणार
राज्यात सातबारा उतार्यात एकसमानता आणल्यानंतर आता या उतार्यावर क्यूआर कोड देण्यात येणार आहे. क्यूआर कोड स्कॅन करताच संबंधित सर्व्हेनंबरचे फेरफार उतारे, जमिनीचा नकाशा, जमिनीचे नेमके स्थान कोठे आहे, याची माहिती मिळणार आहे.
याबाबतचा प्रस्ताव भूमिअभिलेख विभागाने राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर सातबारा उतार्यावर क्यूआर कोड दिला जाणार आहे.
राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत सातबारा उतारे, नकाशे, फेरफार आदी प्रकारचे दस्ताऐवज यांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. जमिनीची मोजणी अचूक पद्धतीने व्हावी, यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ही मोजणी करताना प्रत्येक सर्व्हे नंबरचे को-ऑर्डिनेट निश्चित करण्यात येणार आहे. ते निश्चित केल्यानंतर सातबारा उतार्यावर क्यूआर कोड प्रिंट करण्यात येणार आहे.
सातबारा उतार्यावर क्यूआर कोड कोठे द्यायचा, याबाबत शासनाकडून मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी भूमिअभिलेख विभागाकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
सातबार्यावरील क्यूआर कोड स्कॅन करताच जमिनीची संपूर्ण माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जमिनीच्या प्रकरणांतील फसवणुकीला आळा बसणार आहे.
0 टिप्पण्या