नेवासा पंचायत समिती गणांसाठी नेवासा तहसील कार्यालयात आरक्षण सोडत
नेवासा फाटा: जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी आज  गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद गटाची  सोडत पार पडली तर नेवासा पंचायत समिती गणांसाठी नेवासा तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली.

प्रशासनाने ओबीसी आरक्षणासह जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडती पन्नास टक्के महिला आरक्षणासह जाहीर केल्या आहेत.

 नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद गटात आठ पैकी  सात महिला तर पंचायत समितीत सोळा पैकी आठ महिलांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे पुन्हा एकदा नेवासा तालुक्यात महिला राज येणार आहे

      जिल्हा परिषद गट; आरक्षण

१) सोनई- इतर मागास: (महिला)

२) शनिशिंगणापुर- सर्वसाधारण(महिला)

३) चांदे-अनुसूचित जाती,(महिला)

४) पाचेगाव- अनुसूचित जमाती (पुरुष)

५) भानसहिवरे- इतर मागास,(महिला)

६) भेंडे बु- सर्वसाधारण (महिला)

७) सलाबतपुर- सर्वसाधारण (महिला)

८) बेलपिंपळगाव- अनुसूचित जमाती (महिला)

____________

   नेवासे पंचायत समिती आरक्षण


१)सोनई- (सर्वसाधारण स्री), २)घोडेगाव-(अ.जाती),

३)शनिशिंगणापुर-(सर्वसाधारण स्री)

४)खरवंडी-(सर्वसाधारण स्त्री)

५)करजगाव-(ना.मा.प्र वर्ग)

६)चांदे-(सर्वसाधारण)

७देडगाव-(ना.मा.प्र वर्ग)

८)बे.पिंपळगाव-(ना.मा.प्र स्री)

९)प्रवरासंगम-(अ.जाती स्री)

१०)खामगाव-(सर्वसाधारण)

११)सलबतपुर-(सर्वसाधारण)

१२)कुकाणे-(सर्वसाधारण)

१३)भेंडे-(ना.मा.प्र स्री)

१४)मुकिंदपुर-(सर्वसाधारण स्री)

१५)भानसहिवरे-(सर्वसाधारण स्री)

१६)पाचेगाव-(अ.जाती)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या