हार्दिकचे एकदिवसीय संघात पुनरागमन


मुंबई :
इंग्लंडविरुद्धच्या आगामी प्रत्येकी तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी गुरुवारी भारताचे संघ जाहीर करण्यात आले. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. तसेच पाचव्या कसोटीत खेळणाऱ्या खेळाडूंना पहिल्या ट्वेन्टी-२० साठी विश्रांती देण्यात आली आहे. ट्वेन्टी-२० मालिकेला ७ जुलै, तर एकदिवसीय मालिकेला १२ जुलैला सुरुवात होईल.

पहिला ट्वेन्टी-२० सामना : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, व्यंकटेश अय्यर, यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

दुसरा, तिसरा ट्वेन्टी-२० सामना : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उमरान मलिक.

एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या