स्वयंपाकाचा गॅस आजपासून महागला: आजचे नवे दर

 


भारतामधील तेल कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानंतर आज पुन्हा सर्वसामान्यांना दरवाढीचा चटका दिलाय. आज घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आलेत. आजपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे. या दरवाढीसंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

१४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमधील घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १ हजार ५३ रुपयांवर पोहचली आहे. पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत १८ रुपयांनी वाढली आहे. तर व्यवसायिक वापरासाठीच्या १९ किलो गॅस सिलेंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढवण्यात आलीय.

एक जुलै रोजी दिल्लीमध्ये १९ किलोच्या म्हणजेच व्यवसायिक वापरातील सिलेंडरच्या किंमती १९८ रुपयांनी कमी करण्यात आलेल्या. तर एक जून रोजी व्यवसायिक वापरातील गॅस सिलेंडरच्या किंमती १३५ रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या.

एक एप्रिल रोजी १९ किलो व्यवसायिक गॅस सिलेंडरची किंमत २५० रुपयांनी वाढवण्यात आलेली. त्यावेळी सिलेंडरची किंमत २ हजार २५३ पर्यंत गेलेली. तर एक मार्च रोजी एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत १०५ रुपयांनी वाढवण्यात आलेली. आता पुन्हा एकदा नव्याने किंमती वाढवण्यात आल्याने याचा फटका सर्वसमान्यांना बसणार आहे.

कुठे किती किंमत?

दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत २०२१ रुपये होती. आज त्यात ८ रुपये ५० पैशांनी वाढ झाली असून ही किंमत आता २०३० रुपयांपर्यंत पोहचली आहे. तर कोलकात्यामध्ये सिलेंडरच्या दर आता २१४९ वर पोहचले आहेत. मुंबईत १९९० रुपयांवर, तर चेन्नईमध्ये २१९५ रुपयांपर्यंत एलपीजी गॅसची किंमत कमी झाली आहे. जूनमध्ये व्यावसायिक सिलेंडर १३५ रुपयांनी स्वस्त झाले होते, तर मे महिन्यात घरगुती सिलेंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली होती. पहिल्यांदा ७ मे रोजी ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती तर १९ मे रोजीही घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.

घरगुती सिलेंडरचे दर कसे?

मुंबईमध्ये घरगुती सिलेंडर आता १ हजार ५२ रुपये ५० पैशांना उपलब्ध होईल. तर कोलकात्यामध्ये हाच दर १ हजार ७९ रुपयांपर्यंत गेलाय. चेन्नईमध्ये गॅस सिलेंडर १ हजार ६८ रुपये ५० पैसे इतका असल्याचं इंडियन ऑइल कॉर्परेशनने स्पष्ट केलं आहे.

वर्षभरात घरगुती सिलेंडर २१८.५० रुपयांनी महागला

दिल्लीत गेल्या एका वर्षात घरगुती सिलेंडरचा दर ८३४.५० रुपयांवरून आता १०५३ रुपयांवर पोहोचला आहे. १४.२ किलो घरगुती सिलेंडरच्या दरात १९ मे २०२२ रोजी ४ रुपयांची शेवटची करण्यात आली होती. यापूर्वी ७ मे रोजी दिल्लीत ९९९.५०रुपये प्रति सिलेंडर दर होता. ७ मे रोजी एलपीजी सिलेंडर २२ मार्च २०२२ रोजी ९४९.५० रुपयांच्या तुलनेत ५० रुपयांनी महागला. २२ मार्चलाही सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली होती. यापूर्वी, ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत, दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर ८९९.५० रुपये होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या