विराटबद्दल सेहवागचं वादग्रस्त वक्तव्य: सेहवागला समालोचक म्हणून काढून टाकण्याची क्रिकेट रसिकांची मागणी


भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सहेवाग सध्या टीकेचा धनी ठरत आहे. भारत विरुद्ध इंग्लंडदरम्यान बर्मिंगहम येथे सुरु असणाऱ्या पाचव्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी सेहवागने समालोचन करताना केलेल्या एका वक्तव्यावरुन त्याने क्रिकेट रसिकांचा रोष ओढावून घेतलाय. त्याने केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या ट्विटरवरुन व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्यावर टीका केलीय.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सेहवागने विराट कोहलीसंदर्भात एक वक्तव्य केल्याचं ऐकायला मिळत आहे. विराट कोहलीने इंग्लंडचा फलंदाज बाद झाल्यानंतर केलेल्या नृत्यावरुन सेहवागने मजेदार प्रतिक्रिया देण्याच्या नादात केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. भारताने पहिल्या डावामध्ये ४१६ धावा केल्यानंतर तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांमध्ये गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं.

तिसऱ्या दिवशी हिंदीमध्ये मोहम्मद कैफ आणि सेहवाग हे दोघे समालोचन करत असतानाच इंग्लंडचा एक गडी बाद झाला. त्यानंतर विराट कोहली मैदानामध्येच नृत्य करत आनंद साजरा करु लागला. विराटचं हे सेलिब्रेशन पाहून सेहवागने त्याची तुलना नाचणाऱ्या महिलेशी केली. सेहवागने मजेदार वक्तव्य करण्याच्या नादात विराटच्या नृत्यावरुन दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे अनेकांनी संताप व्यक्त केलाय. सेहवागने दिलेल्या प्रतिक्रियेचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांनी यावर आक्षेप घेत सेहवागविरोधात कारवाईची मागणी केली आहे. सामना प्रसारित करणाऱ्या वाहिनीने सेहवागला समालोचक पदावरुन हटवावं अशी मागणीही अनेकांनी केलीय. नेमका सेहवाग काय म्हणालाय पाहूयात..

लोकांचं यावर म्हणणं काय आहे पाहूयात…

सेहवागवर बंदी घाला

सेहवागने याच्या एक दिवस आधी म्हणजेच कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच कोहलीवर स्लेजिंगवरुन टीका केली होती. विराट आणि जॉन ब्रेस्ट्रोमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीवरुन सेहवागने विराटला लक्ष्य केलेलं. या दोन्ही खेळाडूंमध्ये इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या पहिल्या सेशनमध्ये वाद झाला होता तेव्हा पंचांना मध्यस्थी करावी लागलेली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या