आषाढी वारी अध्यात्माकडून आरोग्याकडे जाणारा राजमार्ग


पायी वेगाने चालण्यामुळे शरिराला तब्बल ३४ फायदे होतात : डॉ. यशवंत पवार

जी. एन शेख | राष्ट्र सह्याद्रीनगर ः

 अध्यात्मात प्रचंड शक्ती आहे, वारीमुळे अर्थातच पायी वेगाने चालण्याचे अनेक शाररीक लाभ सुद्धा होतात. वारी हा अध्यात्माकडून आरोग्याकडे जाणारा राजमार्ग आहे, नियमित चालणे हा एक सर्वोत्तम व्यायाम आहे. विशेष म्हणजे सर्व वयोगटातील लोक हा व्यायाम सहजपणे करू शकतो. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. डिप्रेशनपासून मुक्ती मिळते आणि आपण आजारीही पडत नाही. म्हणून वारी शाररीक लाभासोबत अध्यात्मिक लाभ घडते, असे दैनिक राष्ट्र सह्याद्रीशी बोलताना डॉ. यशवंत पवार (कन्नड) यांनी सांगितले.

आषाढी वारी (पंढरपूर) म्हणजे, वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरपर्यंत काढलेली पदयात्रा होय, वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला पदयात्रा करत जाणार्‍या भक्तांचा जनसंप्रदाय, या संप्रदायाचे वैशिष्ट म्हणजे विविध जातीधर्मातील लोक लाखोच्या संख्येने पायी आषाढी वारी करतात, वारकरी संप्रदायात लहान मोठा भेद नसतो, तसेच नामजपाने पूण्य मिळते हा भाव, एकादशी व इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय, जो नियमित वारी करतो तो वारकरी, वारकरी धर्माला भागवत धर्म असेही म्हणतात.

जी मेघू आपुलिये प्रौढी, जगाची आर्ती दवडी, वाचुनी जातकाची तहान केव्हडी, तो वर्षावी पाहुनी, अर्थात चातकाची तहान केव्हढी, पण ती भागविण्यासाठी मेघाने वर्षाव करावा आणि जगाची तहान भागवावी वारकर्‍याच्या आर्त दर्शनासाठी विश्वरुपी वारीचा सोहळा उभा राहावा,    नदीने समुद्राकडे धाव घ्यावी, तसे जेष्ट महिन्यात वारकर्‍याची पाउले आपोआप पंढरपुरकडे झेपावतात, खांद्यावरची पताका गगणी फडकते, पांडुरंगाचा बुक्का कपाळी येवून बसतो, टाळांचा गजर नादब्रम्ह होतो, अभंगाने आत्मरंगी न्हावून वाटचाल सुरु होते.

 पंढरपूरच्या दिशेने विठुमाउलीच्या भेटी, तहानभुक हरपून ही वारी विश्राम करते ती विठुमाउलीच्या दर्शना नंतरच पंढरपुरला अध्यात्माचा हा अखंड प्रवास वर्षानुवर्ष अविरत चालूच आहे, असेही डॉ. यशवंत पवार म्हणाले.
या व्यायामासाठी एक पैसा पण खर्च लागत नाही, प्रशिक्षणाची गरज नसते, शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. दररोज एक तास चालल्यास संधीवाताचा त्रास कमी होतो. पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे विकार कमी होतात. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढते. हृदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी होत. फुप्पुसाचे कार्यक्षमता चांगली राहते. पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते. चयापचय सुधारते. अंतस्त्रवी ग्रंथीचे कार्य सुधारते. हाडांची मजबुती ही चालण्यामुळे वाढते. कंबर, मांड्या व पायाचे स्नायू मजबूत होतात.

मोतीबिंदूची शक्यता कमी होते. काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव होत. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. नैराश्याची पातळी खाली येते. दररोज ३० मिनिट चालल्याने सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते. आयुष्यमान वाढते. कोणत्याही वयात हे व्यायाम करू शकता. आठवड्यातून दोन तास चालल्याने ब्रेन स्ट्रोकची शक्यता ३० टक्के कमी होते. रोज ३० ते ६० मिनिटे चालल्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी होते. रोज ३० ते ४० मिनिट पायी चालल्याने मधुमेहाचा धोका २९ टक्के कमी होतो. दिवसातून ३० मिनिट पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता ३६ टक्के कमी होते. रोज कमीत कमी १ तास चालल्याने लठ्ठपणा कमी होतो. शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो. शरीराला डी जीवनसत्व मिळते. हाडे मजबूत होतात. शारीरिक आणि मानसिक व्यायाम ही होतो. तन मनाला आलेला थकवा दूर होतो. तणाव आणि चिडचिडेपणा दूर होतो. झोप चांगली लागते. मनाची एकाग्रता वाढते. वजन कमी होते. शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळतात. जय हरी विठ्ठल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या