शिंदे सरकारचा सामान्य जनतेला दिलासा कर कपातीमुळे पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त..
 देशातवाढलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरातून सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कर कपात केली होती. त्यानंतर काही प्रमाणात दर कमी झाले. त्यावेळी केंद्राने राज्यांनाही कपातीची सूचना केली होती मात्र महाराष्ट्रसह काही राज्यांनी ही सूचना मान्य केली नव्हती. आता महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे सेना आणि भाजप यांच्या युती सरकारने पेट्रोल डिझेल ग्राहकांना दिलासा देत कर कपात केली आहे. त्यानुसार राज्यात पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणीच्या दिवशीच इंधनदर कपात करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावर आज निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने पेट्रोल डिझेल VAT कमी केला आहे. त्यामुळे आता पेट्रोल प्रती लिटर पाच रुपये डिझेल प्रतीलिटर तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचं त्यांनी नमूद केलं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी इंधनदर कपात केल्याचं म्हटलं. यावेळी फडणवीस याांनी आणीबाणीच्या काळात कारागृहात गेलेल्या लोकांसाठीची पेन्शन योजना पुन्हा सुरू करणार असल्याचं म्हटलं. महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळातील आर्थिक अडचणीचं कारण देत ही पेन्शन योजना बंद केली होती.

ठाकरे सरकारचे निर्णय फिरवले

राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने ठाकरे सरकारचे निर्णय पुन्हा बदलणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. यापैकी महाराष्ट्रातील सरपंचांची आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारने जनतेतून सरपंचांच्या आणि नगराध्यक्षांच्या निवडीचा निर्णय बदलला होता. या व्यतिरिक्त बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना अधिकार देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या