महिलांना मोफत बसप्रवास म्हणजे क्रांती- स्टॅलिन


चेन्नई, पीटीआय : तमिळनाडूत महिलांना मोफत बसप्रवासाची सवलत देण्याचा निर्णय द्रमुक सरकारने घेतला आहे. त्याकडे एक ‘मोफत रेवडी संस्कृती’ या संकुचित नजरेने पाहिले जाऊ नये. हे एक आर्थिकदृष्टय़ा क्रांतिकारक पाऊल असल्याचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी शुक्रवारी सांगितले.

 स्टॅलिन यांनी सांगितले, की या योजनेच्या लाभार्थीच्या कुटुंबीयांची या निर्णयामुळे आठ ते बारा टक्के बचत नक्कीच होणार आहे.  या निर्णयाचा लाभ ८० टक्के द्रविड समाजातील मागासवर्गीयांना होणार आहे. द्रविड प्रारूप सरकाराचे हे चांगले संकेत आहेत.  गरीब परिवारांची आठ ते १२ टक्के आर्थिक बचत होणार असल्याने मी याला ‘आर्थिक क्रांती’च म्हणतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या