Breaking News

संभाजीनगरमध्ये महिला अधिकाऱ्याला नग्न महिलेचे पेपरवेट दाखवून अश्लील चाळे

 


भाजपा आमदाराची थेट अधिवेशनात तक्रार, म्हणाले…

अधिवेशनात भाजपा आमदार सुभाष देशमुख यांनी संभाजीनगरमधील महावितरण कार्यालयात अधीक्षक अभियंता महिला अधिकाऱ्याला नग्न महिलेचं चित्र असणारं पेपरवेट दाखवून अश्लील चाळे करत असल्याची तक्रार केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करून निलंबन करावे, अशी मागणी सुभाष देशमुखांनी केली. विशेष म्हणजे हा प्रकार जानेवारी २०२२ पासून सुरू असल्याचंही देशमुखांनी नमूद केलं आहे.

सुभाष देशमुख म्हणाले, “संभाजीनगरला महावितरणचं कार्यलय आहे. त्या ठिकाणी अधीक्षक अभियंता प्रविण मारुतीराव दरोली आहेत. त्यांच्या कार्यालयात नग्न महिलेचं चित्र काढलेलं पेपरवेट ठेवलं आहे. त्या ठिकाणी महिला अधिकारीही आहेत.”

“नग्न महिलेचं पेपरवेट दाखवून टिंगल आणि अश्लील चाळे”

“अधीक्षक दरोली कार्यकारी अभियंता असलेल्या महिला अधिकाऱ्याला वारंवार बोलावून हे पेपरवेट दाखवतो. तसेच या पेपरवेटवरून टिंगल करतो आणि अश्लील चाळे करतो,” अशी तक्रार सुभाष देशमुख यांनी केली.

“अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा”

“या महिलेने जानेवारी-फेब्रुवारीपासून हे चाळे सुरू असताना नाईलाजाने आता तक्रार दाखल केली आहे. याची चौकशी करून त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं,” अशी मागणी सुभाष देशमुख यांनी केली.

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी संबंधित तक्रारीची नोंद घ्यावी आणि कारवाई करावी, असे निर्देश दिले.

No comments