बागेत खेळणाऱ्या मुलाला पाळीव श्वान चावले; श्वानाच्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल


पुणे :  बाणेर परिसरात एका सोसायटीच्या बागेत खेळणाऱ्या मुलाला पाळीव श्वान चावल्याने श्वान मालकाच्या विरोधात चतु:शृंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी वतन कांबळे (वय ५५, रा. पोर्शिया, पल्लोड फार्म, बाणेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार पल्लोड फार्म परिसरात राहायला आहेत. त्यांचा मुलगा सोसायटीच्या बागेत खेळत होता. त्या वेळी कांबळे यांचे पाळीव श्वान मुलाला चावले. मुलावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.

गेल्या महिन्यात बाणेर परिसरात पुणे पोलीस दलातील एका सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्ताला पाळीव श्वान चावले होते. निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पाळीव श्वानाच्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या