प्रस्थापितांच्या विरोधात क्रांती घडवणार _ शिवसेना संपर्कप्रमुख घोलप नाना यांची जाहीर घोषणा


अहमदनगर
: नगर जिल्ह्यात प्रस्थापितांच्या विरोधात क्रांती घडविणार असून श्रीरामपूर तालुक्यातील सर्व निवडणुकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याचा मानस असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपण नगर जिल्ह्यात महाविकास आघाडी न करता हा जिल्हा माझ्यासाठी सोडावा अशी विनंती करणार आहे असे विचार माजी मंत्री बबन नाना घोलप यांनी पत्रकारांची औपचारिक चर्चा करताना व्यक्त केले शासकीय विश्रामग श्रीरामपूर येथे शिवसेनेच्या पदअधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता नाशिक सारख्या जिल्ह्यात अनेक प्रस्थापित नेते होते केवळ शिवसेनेचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यामुळे मी काही नसताना आमदार होऊन मंत्री झालो हे केवळ एकनिष्ठ व प्रमाणि कार्यकर्त्यांमुळे शक्य झाले अशा प्रकारची  क्रांति कारण्यासाठी मी नगर जिल्हा पिंजून काढणार असून तो पूर्णपणे भगवामय होईल यासाठी प्रयत्नशील आहे श्रीरामपूर मध्ये शिवसेना ही गद्दारांची नसून खुद्दार यांची आहे हे कार्यकर्त्यांच्या विचारातून मी जाणून आहे  कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांची योग्य ती दखल घेऊन नगरपालिका, पंचायत समिती ,जिल्हा परिषद, अशा अनेक संस्थांवर एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी देऊन समाजसेवा करण्यास कटिबद्ध राहू. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक हा त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता जनतेच्या सेवेसाठी झटत असतो ज्या शिवसेनेच्या जीवावर अनेक खासदार आमदार मोठे झाले त्यांनीच पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसाण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे परंतु येत्या काळात सुज्ञ मतदार अशा गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही .शिवसेना हा कोणाच्याही पुढे न झुकणारा पक्ष आहे स्वर्गीय बाळासाहेब विखे व भाजपाशी झालेले महसूल मंत्री राधा कृष्ण विखे यांना यापूर्वी शिवसेनेच मंत्री केले होते हे ते विसरले वेगवेगळ्या पक्षात जाऊन फक्त सत्तेचा उपभोग घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात .सर्वसामान्य माणूस हा त्यांचा विकासाचा केंद्रबिंदू नसून स्वतःसाठी सत्ता संपत्ती पदे हेच सर्व काही आहे. त्यामुळे त्यांच्यावर काही चर्चा करावी असे मला वाटत नाही स्थानिक आमदारांचे नाव न घेता अनेक जण हे माझ्यामुळे आमदार झाले आहेत .परंतु आज त्यांना तो विसर पडला आहे येणाऱ्या काळात प्रत्येक नेत्याला त्याची जागा दाखवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे घोलप म्हणाले .याप्रसंगी माननीय आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, रावसाहेब खेवरे, शहर प्रमुख सचिन बडदे यांची प्रमुख भाषणे झाली.

यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हाप्रमुख राजेंद्रजी झावरे, रावसाहेब खेवरे  ,तालुकाप्रमुख दादासाहेब  कोकणे ,शहर प्रमुख सचिन बडदे ,महिला जिल्हाप्रमुख सपना ताई मोरे संगमनेरचे मुजीब शेख ,जिल्हा संघटक डॉक्टर शिरसागर, उपशहर प्रमुख रोहित भोसले पाटील,शहर कार्याध्यक्ष राहुल रणधीर ,राधाकिसन बोरकर ,महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख रेखाताई फाजगे, तालुकाप्रमुख पुनम जाधव ,शिव अंगणवाडी जिल्हाप्रमुख सुरेखाताई कदम, कामगार सेना जिल्हाप्रमुख सोमनाथ गोरे रमेश घुले, गणेश बोरुडे, उपतालुकाप्रमुख प्रदीप वाघ ,विजू बडाख, शरद भणगे ,वाहतूक सेना यासीन भाई सय्यद ,बाळू जोशी, व्यापार आघाडीचे जिल्हाप्रमुख रामा शेठ अग्रवाल ,भावेश ठक्कर, रामपाल पांडे ,अरुण पाटील ,सदा कराड ,वाघुले मामा ,अशोक थोरे ,युवा सेना शहरप्रमुख निखिल पवार, बेलापूर शहर प्रमुख लखन भगत किशोर ढोकचौळे, किशोर फाजगे सागर हरके ,बाळासाहेब गायकवाड, प्रवीण शिंदे सुद्धा कावडे,संतोष भाऊसाहेब कांबळे, भाऊसाहेब रंभाजी वाघमारे, संदीप शिंदे, विशाल दुर्गे, प्रकाश माने सर, अमोल क्षीरसागर, नंदू तुपे, सोमनाथ सोनवणे,सचिन डोळस, संजू तुपे,गौरव काळे ,रोहण शिंदे, अनिकेत गायकवाड,सुरेंद्र तोरणे अमित तोरणे  विवेक तोरणे,विकास भांड,परविन शहा,बाळासाहेब गायकवाड ,सुखदेव देवकर,संदीप जगधनी,संदीप जगधनी,राहुल डुकरे ऊमेश अल्हाट धनंजय जानराव, गणप्रमुख राहुल डुकरे, शाखाप्रमुख प्रशांत कुमावत,उपशाखाप्रमुख कार्तिक शिंदे शाखाप्रमुख हेमंत मुसमाडे,खंडाळा शाखाप्रमुख अजित गुजांल गौरव शिंदे, रोहण शिंदे,अदेश पवार,अर्पेश कुमावत, ललित आकाश उमाप, सुनील कुदले,विशाल शिंदे, आकाश शिरसाठ, सुरज गायकवाड,लखन धोत्रे, आकाश गुंजाळ,रोहीत डुकरे अक्षय गावड़े गौरव कदम ,अदित्य बर्फे,सुनील खरात,प्रशांत डावखर,आदित्य वाघ,अजय शिरसाठ, सुनिल डुकरे,सत्यजित विळस्कर,अक्षय फाळके , चैतन्य वाळके, आदित्य वाघ,विनायक वाघ,दिपक शहाने, ऋषिकेश बेलसरे, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या