मोरया मॅट्रिमोनी वधू वर सूचक कार्यालयाचा भव्य उदघाटन सोहळा

 


पुणे :

 मोरया मॅट्रिमोनी या अनोख्या वधू वर सूचक कार्यालयाचा भव्य असा उदघाटन सोहळा अभिनेता विराज कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे या नुकत्याच लग्न झालेल्या जोडीच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला लोकसभेचे खासदार  श्रीरंग आप्पा बारणे, आमदार अण्णासाहेब बनसोडे, IMA PCB चे संस्थापक डॉ . दिलीप कामत, पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर रेखाताई गावडे, तसेच प्रथम महिला महापौर अनिताताई फरांदे, प्रसिद्ध उद्योजक नाथजी राऊत, प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ रोहिदास आल्हाट, IMA PCB चे अध्यक्ष डॉ. विजय सातव, सुहास गारडी, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सत्रे या मान्यवरावाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. कामत सरांनी लग्नाआधी आणि नंतर होणाऱ्या स्त्रियांच्या विविध आजारांबद्दल माहिती दिली, डॉ. सातव सरांनी लग्नाआधी करावयाच्या रक्तातील विविध चाचण्या यावर प्रकाश टाकला. अभिनेत्री शिवानी रांगोळी आपल्या भाषणात छानसा उखाणा घेऊन मोरया मॅट्रिमोनीचे कौतुक केले. अभिनेता विराजास कुलकर्णी यांनी लग्न ठरवत असतानाचे विविध किस्से उलगडले, खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी मोरया मॅट्रिमोनीचा पिंपरी चिंचवड शहराला नक्की चांगला फायदा होईल व घटस्फोटाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे सांगितले. सूत्रसंचालन सुरेश गारगोटे यांनी केले, अॅड. कुंडलीक गावडे यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ. सोनाली सातव यांनी केले. तसेच ऑनलाइन https://www.moryamatrimony.com/ या साइड वर तसेच ऑफलाइन पद्धतीने मोरया मॅट्रिमोनी च्या ऑफिस न. पी २३२ आणि २३३. दुसरा मजला, मयूर ट्रेड सेंटर, चिंचवड स्टेशन. कार्यालयात जाऊन आपली नावनोंदणी करू शकता. बाहेरगावी राहणाऱ्या उमेदवारांसाठी प्राथमिक वधू वर भेट करण्यासाठी या कार्यालयात उत्तम अशी सुविधा करण्यात आली आहे. संपर्क प्रसाद सत्रे ९५२७२६११९१ आणि ८४८४९३०५१५

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या