फिल्म इन्स्टिट्यूटच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या


पुणे : 
पुण्यातील फिल्म ॲंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ( एफटीआयआय) मुलांच्या वसतिगृहामध्ये एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

अश्विन अनुराग शुक्ला (३२, रा, गोवा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. एफटीआयआय मधील मुलांच्या वसतिगृहातील एस १२ बी ब्लॉक रूममध्ये ही घटना घडली. आज (शुक्रवार) सकाळी नऊच्या सुमारास एफटीआयआय मधील एक रूम आतमधून बंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यांनतर तत्काळ डेक्कन पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी खिडकीतून पाहिल्यानंतर आतमध्ये तरुणाने गळफास घेतल्याचे दिसून आले. अग्निशामक दलाला पाचारण करून तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या