मंकी हिल जवळ पुन्हा दरड कोसळली: रेल्वे इंजिनमध्ये दगड आडकल्याने इंजिन रुळावरून उतरले खाली


लोणावळा :
मुंबई पुणे लोहमार्गावरील मंकी हिल याठिकाणी आज पहाटेच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली. यामध्ये एक मोठा दगड खाली येऊन रेल्वे इंजिनच्या समोर आडकल्याने रेल्वे इंजिन रुळावरून खाली घसरले. घटनेची माहिती समजल्यानंतर पहाटे साडेतीन वाजता रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहचत त्यांनी दरड बाजूला करण्याचे काम सुरु आहे. दगड रेल्वे इंजिनच्या समोरील गार्डमध्ये आडकला आहे. मागील काही दिवसातील ही तिसरी घटना आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे डोंगर भागातून दगड व माती पाण्याच्या सोबत खाली घसरत असल्याने असे प्रकार घडत आहे. मंकी हिल या संपूर्ण परिसरातील रेल्वे मार्ग हा डोंगरातून असल्याने याठिकाणी वारंवार असे प्रकार घडत आहेत. वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. रेल्वे वाहतूक सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या